Surprise Me!

Reliance Industries | हया अब्जाधीशांच्या मुलाने लहानपणी विकले होते फुगे | Lokmat News

2021-09-13 58 Dailymotion

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. कार्यक्रमाला काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावलेली होती. शाहरुख खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होता. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि शाहरुख खान स्टेजवर असताना, शाहरुखने अनंतचा बालपणीचा एक किस्सा सांगितला.<br />‘धीरुभाई अंबानी यांच्या सोबत अनंत मरीन ड्राईव्ह येथून जात होता. त्यावेळी तो सहा वर्षांचा होता. तेथून जात असताना अनंतने धीरुभाईंना फुगे घेऊन देण्याचा हट्ट केला होता. त्यांनी १५ रुपयांचे दहा-बारा फुगे घेऊन दिले. मात्र हे १५ रुपयांचे फुगे महाग असल्याचे अनंतला जाणवले. घरी जाताना त्याने २ रुपयांचे फुग्यांचे पाकिट विकत घेतले. नंतर ते फुगे फुगवून अनंतने विकले’, असे शाहरुखने सांगितले. यावर अनंत म्हणाला की, ‘फुग्यात भरण्यासाठी हवा तर मोफतच आहे. म्हणून ते फुगे फुगवून मी विकले.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon